पुणे, वडगाव शेरी परिसरात भिषण आग

0

पुणे : अहमदनगर रस्त्यावर वडगाव शेरी परिसरात सोपान नगर येथे एका गोडाऊनला आज दुपारी भीषण आग लागली. अग्निशमन दलाची पाच वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत.

आगीमुळे आकाशात मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ तसेच काळे धुराचे लोट निर्माण झाले आहे. धक्कादायक म्हणजे या गोडाऊनमध्ये अनेक सिलिंडर असल्याची माहिती आहे. आगीमुळे हे सिलेंडर फुटत असल्याने मोठा आवाज होऊन आग भडकत आहे.

दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत अद्याप उलगडा झाला नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.