पुणे, मुंबईसह विदर्भ आणि मराठवाड्यात आज मुसळधार पाऊस

0

पुणे : राज्यात मागच्या चार दिवसांपासून काही जिल्ह्यात पावसाने उसंत दिला आहे यामुळे काही भागातील आलेला पूर ओसरण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान राज्यातील काही भागात पुन्हा पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

पुणे, मुंबईसह राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान पुणे, जळगावसह विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यात काल (दि.15) कुठे संततधार तर कुठे मध्यम स्वरूपाच्या पाऊस झाला. या पावसाने जिल्हातील नदी-नाले पुन्हा तुंडुंब भरुन वाहत आहेत. दरम्यान झालेल्या पावासाने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा संकट येईल अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. भंडारा जिल्हाला हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आल्याने पावसाची पुन्हा शक्यता आहे.

दरम्यान भंडार जिल्ह्यात झालेल्या पावसाने वैनगंगा नदी इशारा पातळीवर पोहचली असून वैनगंगा नदीला नियंत्रित करण्याकरिता गोसीखुर्द धरणाचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावाला धोकादायक इशारा देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन पुन्हा एकदा अलर्ट मोडवर आले आहे. विशेष म्हणजे संभाव्य पुर परिस्थिति लक्षात घेता जनतेसाठी जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी एक संदेश ही जारी करत सुरक्षित राहाण्याचे आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.