मुंबई : राज्यातील अनेक भागात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सोमवार सकाळपासूनच मुसळधार पावसाने सुरुवात केली असून पुढचे काही दिवस राज्यात ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
राज्यात 6 ते 7 जानेवारीला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात हलक्या सरींच्या पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तसंच महाराष्ट्रातील किमान तापमानात येत्या 3 ते 4 दिवसांत घट होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे राज्यासह संपूर्ण उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात थंडी पडली आहे.
संपूर्ण उत्तर भारत थंडीमुळे गारठला आहे. सततच्या ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे निम्म्यापेक्षा अधिक पिके खराब झाली असून रोगाचे प्रमाण वाढले आहे.