पुणे : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात लॉकडाऊनची घोषणा केली. 1 जूनपर्यंत असणारा लॉकडाऊन आता 15 दिवसांसाठी वाढवण्यात आला आहे. यामध्ये पुण्यात स्थानिक पातळीवर स्पा, सलून आणि जिम सुरू करण्यात आले होते मात्र राज्य सरकारच्या आदेशानुसार ते आता बंद करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्रासह पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महापालिका स्थानिक पातळीवर पुणे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार स्पा, सलून आणि जिम सुरु करण्यात आल्या होत्या.
मात्र राज्य सरकारने केलेल्या नियमावलीमुळे निर्णयात बदल करण्यात आला आहे. पुण्यातील उद्याने, मैदान, मंगल कार्यालय, पीएमपीएमएल बससेवा, सलून, जिम बंद राहणार आहे. शनिवार आणि रविवार सकाळी 7 ते 2 यावेळेत फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरु राहणार, अन्य दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. दुपारी तीन वाजल्यानंतर नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.
दरम्यान, महापौर म्हणाले दुकाने सुरू राहणार मात्र आयुक्त म्हणाले दुकाने बंद राहणार त्यामुळे सर्व व्यावसायिक संभ्रमात होते. टीव्ही चॅनेलसह वृत्तपत्रांमध्येही सलून बंद ठेवण्यात आल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे आणखीनच संभ्रमाचं वातावरण झालं होतं.