जळगावच्या चोपडा शिवारातील जंगलात हेलिकॉप्टर कोसळले

0

जळगाव :  चोपडा तालुक्यातील वर्डी शिवारात वनक्षेत्रात हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाला आहे.  या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर महिला पायलट गंभीर जखमी झाल्या आहेत. ही दुर्घटना आज (शुक्रवार) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर कोसळले आहे तो जंगल परिसर आहे.

चोपडा तालुक्यातील वर्डी शिवार असलेला भाग हा आदिवासी परिसर आहे. सातपुडा पर्वत रांगेत असलेल्या राम तलाव परिसरात ही घटना घडील आहे. दुर्घटना झालेले हेलिकॉप्टर आहे की प्रशिक्षणार्थींचे विमान आहे ही माहिती अद्याप समजू शकली नाही. परंतु हेलिकॉप्टर असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला तर महिला पायलट गंभीर जखमी आहे. आदिवासी परिसर असल्याने तेथील आदिवासी बांधवांनी हेलिकॉप्टर मधील महिला पायलटला जखमी अवस्थेत बाहेर काढून उपचारासाठी दवाखान्यात नेले.

दुर्घटना घडली ते ठिकाण जंगलात आहे. या ठिकाणी पोहचण्यासाठी काही किलोमीटर पायी जावे लागत असल्याने प्रशासनाची देखील तात्काळ मदत मिळणे अवघड झाले आहे. तरी देखील बचाव पथक घटनास्थळी पोहचले असून बचावकार्य सुरु झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Maharashtra: One person dies, another injured in a chopper crash in Jalgaon; police & local authorities on the spot. Details awaited pic.twitter.com/Mc0aUPsWKA

— ANI (@ANI) July 16, 2021

Leave A Reply

Your email address will not be published.