हिंजवडी पोलिसांनी एक लाख रुपयांचे ‘मेफेड्रॉन ड्रग्ज’ केले जप्त

0

पिंपरी : एक लाख रुपये किंमतीचे मेफेड्रॉन ड्रग्ज बाळगल्या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 26) दुपारी ताथवडे येथे करण्यात आली.

 

उमेद मोह्जम शेख (21, रा. पिंपरी), निहाल रसउल्ला शेख (21, रा. पिंपरी), अब्दुल कादिर सय्यद (23, रा. पिंपरी), अमित तलाराम भाटे (25, रा. हिंजवडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मेफेड्रॉन ड्रग्ज जवळ बाळगले. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता ताथवडे येथे कारवाई करून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मेफेड्रॉन ड्रग्ज, दोन दुचाकी असा एकूण एक लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.