पिंपरी : हिंजवडी पोलिसांनी एका टेम्पो मधून 15 लाख 95 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. हि कारवाई शनिवारी (दि.25) भुगाव येथे करण्यात आली आहे.
याप्रकऱणी रामलाल चौघाजी चौधरी (45, रा. पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हात्याच्या टेम्पो मधून (एमएच 12 यु.एम 9314) विषारी गुटखा घेऊन जात असल्याची खबर मिळताच पोलिसांनी सापळा रचून आरोपीलाताब्यात घेत त्याच्याकडून 15 लाख 95 हजार 288 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. यावरून हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
हि कामगिरी वरिष्ठ निरीक्षक विवेक मुगळीकर, सुनील दहिफळे, सोन्याबापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंदे विरोधी पथकाचेप्रमुख अजितकुमार खटाळ, उपनिरीक्षक महेश वायबसे, कर्मचारी संतोष डामसे, सराटे, हांगे यांनी केली.