पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौरपदी हिराबाई उर्फ नानी घुले बिनविरोध

0

पिंपरी : महापालिकेच्या उपमहापौर पदासाठी आज निवडणुक होणार होती. मात्र ऐनवेळी राष्ट्रवादी कडून नगरसेवक पंकज भालेकर यांनी माघार घेतल्याने उपमहापौरपदी हिराबाई उर्फ नानी घुले यांची बिनविरोध निवड झाली.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपमहापौर केशव घोळवे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. अवघ्या ५ महिन्याच्या कालावधीत घोळवे यांनी दिला राजीनामा आहे. वैयक्तिक कारणाने राजीनामा दिला असल्याचे स्पष्टीकरण पक्षाच्यावतीने देण्यात आले आहे. त्यामुळे उपमहापौर पद हे रिक्त झाले आहे.

आज 23 मार्च रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपमहापौर पदासाठी निवडणुक घेण्यात आली.   राष्ट्रवादी कडून नगरसेवक पंकज भालेकर यांचे दोन तर भाजपकडून हिराबाई नानी घुले यांचे तीन  अर्ज भरण्यात आले होते.

महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजपचाच उपमहापौर होणार हे नीच्चीतच होते.  नगरसेवक वसंत बोऱ्हाडे आणि नगरसेवक रवी लांडगे दोन नावे चर्चेत होती. पण ऐनवेली नावे बदलण्यात आली. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ ही म्हण आज खरी ठरली.

Leave A Reply

Your email address will not be published.