‘त्या’स्कॉर्पिओ गाडीचे मालक हिरेन नसून दुसरेच कोणी तरी

0

ठाणे : प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ कारप्रकरणी मनसुख यांची मुंबई क्राईम ब्रँच आणि एटीएस चौकशी करत होते. मात्र चौकशीदरम्यान मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला. याप्रकरणी हिरेन यांच्या पत्नी विमला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एटीएसने ७ मार्चला रीतसर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. विमला यांनी एटीएसने दिलेल्या आपल्या जबाबात अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. विमला यांनी जबाबात नोव्हेंबर २०२० ते ६ मार्च पर्यंतचा घटनाक्रम उलगडला आहे. या जबाबातून मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर मिळलेल्या स्कॉर्पिओ कारचा खरा मालक डॉ. पिटर न्यूटन असल्याचं समोर येत आहे.

एटीएसने विमला यांच्या नोंदवलेल्या जबाबात असे नमूद करण्यात आले आहे की, विमला आणि मनसुख यांना मीत (२०), वंश (१३) आणि लकी (१९) ही तीन मुलं असून मनसुख यांचे क्लासिक कार डेकोर नावाचे ठाण्यात ऑटोमोबाईल ऍक्सेसरीज विक्रीचा व्यवसाय आहे. आमच्या व्यवसायातील ग्राहक डॉ. पिटर न्यूटन यांच्या मालकीची महिंद्रा स्कॉर्पिओ कर क्रमांक एमएच ०२/एवाय २८१५ हि गेल्या ३ वर्षांपासून त्यांच्या संमतीने आमच्या ताब्यात होती. वाहनाचा वापर आम्ही कुटुंबीय करत होतो. आमच्या व्यवसायाच्या निमित्ताने ग्राहक असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे हे माझ्या पतीच्या परिचयाचे होते.

वाझे यांना माझे पती मनसुख यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये स्कॉर्पिओ कार वापरण्यासाठी दिली होती. ही स्कॉर्पिओ कार वाझे यांनी ५ फेब्रुवारीला त्यांच्या चालकामार्फत माझ्या पतीकडे दुकानावर पाठवून दिली. त्यावेळी स्कॉर्पिओचे स्टेअरिंग हार्ड वाटत असल्याचे मनसुख यांनी मला सांगितले होते. मनसुख १७ फेब्रुवारीला सायंकाळी ६. ३० वाजताच्या सुमारास ठाणे येथील दुकानातून व्यवसायानिमित्त स्कॉर्पिओमधून एकटेच मुंबईला जाण्यासाठी निघाले. मात्र, मुलुंड टोल नका क्रॉस करून पुढे गेल्यानंतर कारचे स्टेअरिंग हार्ड वाटत असल्याने मनसुख यांनी गाडी रस्त्याच्या बाजूला पार्क केली. त्यांनतर ओला / उबर कारने पुढे मुंबईला गेले होते. त्यानंतर १८ फेब्रुवारीला दुकानातील कर्मचाऱ्याला सोबत घेऊन स्कॉर्पिओ दुरुस्त करण्यासाठी म्हणून पार्क केलेल्या ठिकाणी गेले असता कार त्या ठिकाणी दिसली नाही. ही बाब मनसुख यांनी पत्नी विमला यांना १८ फेब्रुवारीला सांगितली. नंतर कार हरवल्याबाबत मनसुख यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Leave A Reply

Your email address will not be published.