प्रवाशांना झालेला त्रास हॉलीडेज कंपनीला पडला महागात

टुरचे पैशांसह १२ लाख २० हजार रुपये परत करावे लागणार

0

पुणे : पुर्ण पैसे भरूनही केरळ आणि कन्याकुमारी टुरदरम्यान योग्य सेवा न पुरविणे हॉलीडेज कंपनीला भलतेच महागात पडले आहे. प्रवाशांना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासाच्या नुकसान भरपार्इपोटी हॉलीडेज कंपनीला पाच लाख मोजावे लागणार लागणार आहे. कंपनीला एकूण १२ लाख २० हजार रुपये तक्रारदारांना परत करावे लागणार आहेत.
स्वागत हॉलीडेज विरोधात हा निकाल देण्यात आला आहे. मधुकर लक्ष्मण चरवड यांच्यासह १९ प्रवाशांनी अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात याबाबत तक्रार दिली होती.

तक्रारदारांनी टूरसाठी भरलेले ५ लाख २६ हजार ५०० रुपये टूर कंपनीने १० टक्के व्याजाने परत करावे. दंडात्मक खर्च म्हणून दोन लाख रुपये द्यावेत. तसेच प्रवाशांना झालेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासापोटी पाच लाख रुपये आणि तक्रारखर्च म्हणून २५ हजार रुपये तक्रारदारांना द्यावेत, असा निकाल आयोगाचे अध्यक्ष जे. व्ही. देशमुख, सदस्य शुभांगी दुनाखे आणि अनिल जवळेकर यांनी दिला. निकालाची प्रत मिळाल्यानंतर ४५ दिवसांत पैसे परत न केल्यास १५ टक्के व्याज आकारले जार्इल, असे आदेशात नमूद आहे. प्रवाशांच्यावतीने ॲड. ज्ञानराज संत यांनी या तक्रारीचे कामकाज पाहिले. टुरच्या पुढील खर्चासाठी कंपनीने ४० हजार रुपये तक्रारदारांकडून घेतले. हे पैसे परत करण्यासाठी दिलेला दोन लाख रुपयांचा चेक कंपनीने दिला होता. मात्र तो वटलाच नाही.

प्रवाशांना अतिरिक्त दिड लाख खर्च करावा लागला :
तक्रारदरांनी कंपनीकडून केरळ आणि कन्याकुमारी टूरसाठी कंपनीचे पॅकेज घेतले होते. ही टूर कंपनीने एक दिवस उशिराने सुरू केली. विमानाने पुण्याहून कोयंबटूर एवजी बंगरुळला नेले. ट्रीप मॅनेजर बरोबर पाठवला नाही. सध्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली. हॉटेलमध्ये पाणी, जेवण आणि इतर अनेक बाबींकरता आम्हाला खर्च करावा लागला. कंपनीच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना अतिरिक्त एक लाख ५३ हजार रुपये खर्च करावा लागला, अशी तक्रार दाखल करण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.