हिरेन यांच्या पत्नीनं सचिन वाझेंवर खुनाचा आरोप केला आहे. त्यानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येच सचिन वाझे आणि शिवसेनेवर टीकेची झोड उठवली होती. एवढेच नव्हे तर तात्काळ वाझे यांना निलंबीत करून नंतर बडतर्फ करा आणि अटक करा अशी मागणी केली फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर सचिन वाझे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांची 3 वेळा भेट देखील घेतली होती. अखेर आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांची मुंबईच्या गुन्हे शाखेतून बदली करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे वाझे यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे.
मुंबई : ठाकरे सरकारने पोलिस अधिकारी सचिन वाझेंबाबत अतिशय मोठा निर्णय घेतला आहे. वाझे यांची मुंबईच्या गुन्हे शाखेतून उचलबांगडी करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या दोन-चार दिवसांपासूनच मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात सचिन वाझे हे मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन यांची हत्या केल्याचा संशय असल्याचा आरोप केला होता.