ऑनरकिलींग : बहिणीचा गळा आवळून तर तिच्या प्रियकराचा गोळ्या झाडून खून

0

जळगाव : प्रेम प्रकरणातून भावानेच बहिणीचा गळा आवळून, तर तिच्या प्रियकरावर गोळी झाडून दोघांचा खून केल्याची घटना चोपड्यात घडली आहे. ही खळबळजनक घटना चोपडा वराड रस्त्यावर घडली.

चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रात्री अकराच्या सुमारास एक मुलगा पिस्टल घेऊन स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला आणि आपण दोघांना मारून आलो असे पोलिसांना स्वतः सांगितले. यामुळे पोलिसही चक्रावून गेले.

चोपडा शहर पोलिसांनी चोपडा वराड रस्त्यावर जाऊन पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यावेळी एका नाल्यात दोघांचे मृतदेह आढळून आले. यात मुलाची गोळी मारून तर मुलीच्या गळा आवळून खून केल्याची स्पष्ट झाले.

ऑनरकिलींगच्या घटनेत रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. या घटनेमध्ये वर्षा समाधान कोळी (20 रा. सुंदरगढी,चोपडा),  राकेश संजय राजपूत (22, रा. रामपुरा चोपडा) अशी या दोघांची नाव आहेत.

राखी पोर्णिमेला दोन दिवस उलटताच भावाने बहिणीचा गळा घोटला. या प्रकराने सर्वचजण हादरले असून काही वर्षापूर्वी धरणगाव आणि दोनगाव येथे देखील अशीच घटना घडली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.