पिंपरी : जागतिक महिला दिनानिमित्त
प्रभाग क्र.२४ मधील स्वच्छता करणाऱ्या सर्व महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्याना गौरविण्यात आले.
नगरसेविका झामाताई बाळासाहेब बारणे, माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे यांच्या अध्यक्षतेखाली व ॲड.पुनम राऊत, जोशी मॅडम, शारदा नितनवरे, संध्या वाघ, प्रज्ञा शिक्षण संस्थापक गवळी मॅडम, शिव व्याख्याते श्री.निलेश मरळ, प्रतिमा घोडके यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
थेरगाव परिसरात काम करणाऱ्या महिलांचा सिद्धेश्वर बारणे यांच्या वतीने सन्मान करण्यात आल्याने त्यांना आनंद झाला. यातील महिलांनी बारणे यांचे आभार मानले.