हॉटेलचे जेवण महागले, 1 जून पासून होणार दरवाढ

0

पिंपरी : गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे आता हॉटलचे जेवणही महागणार आहे. पिंपरीचिंचवड शहरातील हॉटेल व्यावसायिकांनीहॉटेलच्या दरांमध्ये 10 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन दरांची 1 जून 2022 पासून अंमलबजावणी होणारआहे.

पिंपरीचिंचवड हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट असोशिएशनची मंगळवारी (दि.17) कासारवाडीत सभा झाली. या सभेत सध्याच्या दरामध्ये 10 टक्यांनी वाढ करण्याचा ठराव करण्यात आला. याबाबतची माहिती असोशिएशनचे अध्यक्ष पद्मनाभ शेट्टी, गोविंद पानसरे यांनीप्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

देशातील, राज्यातील इंधन, गॅस सिलेंडरची दरवाढ, सीएनजी दरातील वाढ, विद्युत दरवाढ मोठ्या प्रमाणात झाली आबे. अनेक राज्यसरकार, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या करांमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. कोरोनानंतरचा नाजूक काळ लक्षात घेता महागाईआकाशाला भिडलेली आहे. वाहतुकीच्या दरात प्रचंड दरवाढ झाली. मालवाहतुक महागली आहे. हॉटेल व्यावसायिकांना कारागीर, मजूरउपलब्ध होणे अवघड झाले आहे.

याबाबत न्याय मिळवण्यासाठी केंद्र, राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडे उपाययोजनाची मागणी करत आहोत. तथापि, प्राप्त परिस्थितीत कच्या मालाच्या दरवाढीसह सर्व बाबींचा विचार पूर्वीच्या दराने देणे अशक्यप्राय झाले आहे. त्यामुळे 1 जून 2022 पासून पिंपरीचिंचवड हॉटेल मधील सर्व व्यावसायिक सध्याच्या दरामध्ये 10 टक्क्यांनी वाढ करणार असल्याचे असोशिएशननेप्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.