विविध मागण्यांसाठी हॉटेल व्यवसायिकांचे आंदोलन

0

पुणे : हॉटेल व्यवसाय सकाळी ११ ते रात्री ११ दरम्यान सुरू करण्यास परवानगी द्यावी, उत्पादन शुल्क परवाना शुल्काची संपूर्ण माफी करावी, सर्व परवानाधारक आतिथ्य व्यवसायांसाठी विद्युत दरात कपात करावी, अशा विविध मागण्यांसाठी ‘युनायटेड हॉस्पिलिटी असोसिएशन’च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.

हॉटेल व्यावसायिकांनी हातात फलक, बॅनर घेऊन आंदोलकांनी संचारबंदीचा निषेध केला. असोसिएशनचे अध्यक्ष संदीप नारंग, उपाध्यक्ष ॲड. अजिंक्य शिंदे, सचिव दर्शन रावल, खजिनदार समीर शेट्टी यावेळी उपस्थित होते. याबाबत नारंग म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे हॉटेल व्यवसायिकांचे कंबरडे मोडले आहे. हॉटेलांसाठी जेवणाची परवानगी सकाळी ११ ते रात्री ११ पर्यंत द्यावी. उत्पादन शुल्क परवाना शुल्काची संपूर्ण माफी करावी. तसेच सर्व परवानाधारक आतिथ्य व्यवसायांसाठी विद्युत दरात सवलत द्यावी, अशा आमच्या मागण्या आहेत.

ॲड. शिंदे म्हणाले, २०२१-२०२२ च्या निवासी दराच्या व्यावसायिक आस्थापनांच्या मालमत्ता करात कपात करून हॉटेल व्यवसायिकांना उभारी द्यावी. रावल म्हणाले, आमच्या उद्योगाला लावलेल्या लॉकडाउन व निर्बंधांवर फेरविचार करावा. उपरोक्त नमूद केलेल्या मुद्द्यांबाबत आम्हाला दिलासा द्यावा. जेवण्याच्या डिलिव्हरीसाठी परवानगी दिलेली वेळ पुरेसे नाही. त्यामुळे सरकारने आमचा विचार करून आम्हास न्याय द्यावा.

जिल्हाधिकारी कार्यालय – हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासह विविध मागण्यांसाठी ‘युनायटेड हॉस्पिलिटी असोसिएशन’च्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.