इथपर्यंत पोहोचण्यासाठी हृतिकला करावा लागला मोठा स्ट्रगल

0

मुंबई ः आज प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशनचा वाढदिवस. त्यानिमित्ताने आपण हृतिकने बाॅलिवुडमध्ये करिअर सुरू करताना केलेला स्ट्रगलदेखील काही कमी नाही. स्टारकिड असूनसुद्धा त्याला खूप कष्ट उपसावे लागले आहेत. पण, आज हृतिकच्या गुड लूकवर अनेक चाहते फिदा आहेत. त्याला यशापर्यंत पोहोचण्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागला आहे. त्याने केलेला स्ट्रगल आज आपण पाहू…

२००० साली ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून हृतिकने चित्रपटात पदार्पण केले. त्याचा हाच चित्रपट त्याला एका रात्रीच सुपरस्टार करून गेला. बऱ्याच जणांना असं वाटतं की त्यांच्या वडिलांनी हृतिकला पहिला चित्रपट दिला आहे, त्यामुळे त्याला फारसे कष्ट सोसावे लागलेच नाहीत. मात्र, यात काही तथ्य नाही. हृतिकला चित्रपटांचं काम यावं म्हणून वडील राकेश रोशन नेहमी सेटवर नेत असत.

लहानपणापासूनच हृतिकला अभिनेता होण्याचं स्वप्न होतं. फिल्ससंबंधी हृतिकला माहिती व्हावी यासाठी राकेश रोशन यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून ठेवले होते. यामध्ये मोठमोठ्या अभिनेत्यांना चहा देण्याचं कामही हृतिकने केलेले आहे. राकेश रोशन यांच्या ‘करण अर्जुन’ चित्रपटात हृतिकने सहाय्यक दिग्दर्शक म्हमून काम केलेले आहे. यावेळी हृतिकला आराम देखील कोणी करु देत नव्हते.

एकदा हृतिक मुलाखतीत म्हणाला होता की, “त्यावेळी घेतलेल्या अनुभवाने मला पुढे जाण्यास मदत फार मदत केली. चित्रपटाच्या सेटवर कॅमेराच्या मागे एखादी वस्तू लवकर मिळत नसली तर किती ओढाताण होते, याचा अनुभव घेतला आहे. हृतिकच्या करिअरचा विचार केला तर, ‘आशा’ चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलेले होते, त्या कामाचे त्याला १०० रुपये मिळाले होते. क्रिष सिरीज, जोधा अकबर, धूम-२, अग्निपथ, कभी खुशी कभी गम, वाॅर यांसारखे हृतिकची चित्रपट सुपरहिट झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.