शेतकरी आंदोलनाला प्रचंड पाठिंबा 

उबदार कपड्यासांठी शेतकऱ्यांना गायक दिलजितने दिले १ कोटी

0

नवी दिल्ली ः दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनला विविध स्तरातून पाठिंबा वाढत चालला आहे. बाॅलिवुड, राजकारण, समाजकारणातील लोकांनी केंद्राच्या विरुद्ध शेतकऱ्यांना पाठिंबा घोषीत केला आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर केंद्रांच्या विरोधात आवाज उठविणारे बिहारचे विरोध पक्षनेते तेजस्वी यादव, काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मदन मोहन यांच्यासहीत १८ जणांवर आणि ५०० अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.

गायक-अभिनेता दिलजित दोसांझ

या पार्श्वभूमीवर तेजस्वी यादव म्हणतात की, ”शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर आवाज उठविला म्हणून डरपोक सरकारने माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. शेतकऱ्यांसाठी फाशीवरदेखील जायला तयार आहे.” तसेच बाॅलिवूडमधूनही मोठा पाठिंबा शेतकऱ्यांना मिळतो आहे. सोनू सूद, तापसी पन्नू, उर्मिला मातोंडकर, रिचा चढ्ढा, स्वरा भास्कर, बाॅक्सर विजेंदर सिंग, क्रिकेटपटू हरभजनसिंग यांनी पाठिंबा दर्शविला आहे. विजेंदरसिंग म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर खेलरत्न पुरस्कार परत करू”, असेही विजेंदरसिंगन म्हणाले.

दिल्लीत कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत बसलेल्या शेतकऱ्यांसाठी अभिनेता-गायक दिलजीत दोसांझ याने शेतकऱ्यांची भेट घेऊ आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. त्याचबरोबर थंडीपासून बचाव व्हावा म्हणून उबदार कपड्यांसाठी त्याने शेतकऱ्यांना १ कोटी रुपयांची देणगीदेखील दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.