खाकीतील माणुसकी…महिला पोलीस अधिकाऱ्यानी रस्त्यावर टाकलेल्या बाळाचा वाचविला जीव

0
पुणे: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अवघ्या एका दिवसाच्या बाळाला टाकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना पुणे शहरात घडली आहे. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या सहायक पोलिस निरीक्षक मधुरा कोराणे यांनी कार्यतत्परता दाखवत त्या बाळाचा जीव वाचविला आहे.

कात्रज घाटाच्या रस्त्याच्या बाजूला बाळाला टाकून दिल्याची माहिती मधुरा कोराणे यांना मिळाली होती. माहिती मिळताच कोराणे यांनी क्षणाचा विलंब न करता दुचाकीवरून घटनास्थळी पोहचल्या. त्यांनी बाळाला उचलून घेतले आणि त्यानंतर त्या बाळाला स्वतः रूग्णालयात घेऊन गेल्या.

मधुरा कोराणे यांनी वेळीच सावधानता दाखवून बाळाला रुग्णालयात दाखल केल्यामुळे बाळाचा जीव वाचला आहे. त्यांनी केलेल्या या कार्याचे परिसरातून कौतुक केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.