पत्नीच्या आत्महत्येचा विरह सहन न झाल्याने पतीचीही आत्महत्या

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन दिवसांपूर्वी पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा विरह सहन न  झाल्याने पतीनेही आज बुधवारी गळफास घेतल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना गणेशनगर, डांगे चौक येथे घडली आहे.

अक्षय अंबिलवादे (२५, रा. गणेशनगर, डांगे चौक) आणि अश्विनी जगताप-अंबिलवादे (२५) असे आत्महत्या केलेल्या जोडप्याचे नाव आहे.

अक्षय आणि अश्विनी डांगे या दोघांचा पाच महिन्यापूर्वी २९ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रेमविवाह झाला होता. अक्षयला चिंचवड येथील एका सराफाच्या दुकानात नोकरी मिळाली. त्यामुळे अक्षय अश्विनी सोबत चिंचवड येथे राहू लागला. दरम्यान, अश्विनीने रविवारी (१० एप्रिल) राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

अश्विनीचा अंत्यविधी झाल्यानंतर तो आई वडिलांसोबत डांगे चौक येथे आला होता. त्याच्या मित्र परिवाराला अक्षय काहीतरी चुकीचे पाऊल उचलेल, याची कल्पना होती. त्यामुळे मित्र त्याच्याजवळच बसून होते. दरम्यान, बुधवारी सकाळी मित्र अंघोळीसाठी आपापल्या घरी गेल्यानंतर अक्षयने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Leave A Reply

Your email address will not be published.