पुणे : पोलिसांशी धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणात पती-पत्नीला मार्केटयार्ड पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
शंकर पोटे (वय ३०) आणि त्याची पत्नी दीपाली (वय २५, दोघेही, रा. गल्ली क्रमांक ३, आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) अशी पोलिस कोठडी झालेल्यांची नावे आहेत.मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे पोलिस हवालदार चंद्रकांत केंद्रे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. २५ मे रोजी रात्री ८.४५ च्या सुमारास मार्केटयार्ड येथील आंबेडकरनगर येथील गल्ली क्रमांक ३ येथे ही घटना घडली.
दोघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी पोटे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. अधिक तपासासाठी त्याला आणि पत्नीला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकिलांनी केली. ती मागणी ग्राह्य धरत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनाव