पत्नीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणा-या पतीला अटक

0

पुणे : पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी पतीला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला २७ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

धोंडीबा भाऊसो शिंदे (वय ४१) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी विवाहितेची सासू हिराबार्इ भाऊसो शिंदे आणि सासरा भाऊसो बापू शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलम धोंडिबा शिंदे (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत त्यांच्या भाऊ सागर विठ्ठल भालेराव (वय २८, रा.दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. २० मे २०२१ रोजी निलम यांनी वाडेबोल्हार्इ येथील एका विहीरीत उडी मारत आत्महत्या केली होती.

कौटुंबिक कारण आणि संशयितवृत्तीने शारीरिक, मानसिक छळ करून निलम यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी धोंडीबा याला न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.