हुंडाई मोटारने बंद केले तीन कारचे काही व्हेरियंट्स

0

नवी दिल्लीः हुंडाई मोटार इंडिया कंपनीने नवीन वर्षाच्या सुरुवातीला तीन कारचे काही व्हेरियंट्सचे प्रोडक्शन आणि विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

या कारमध्ये प्रसिद्ध कॉम्पॅक्ट एसयूव्ही Hyundai Venue 1.0L Turbo S MT सोबत हॅचबॅक सेगमेंट मध्ये Santro 1.1 MT Corporate, Santro 1.1 AMT Corporate, Grand i10 NIOS 1.2 MT Corporate, Grand i10 NIOS 1.2 AMT Corporate यासारख्या कारचा समावेश आहे.

कंपनी व्यवस्थापनाने सांगितले की; या तिन्ही कारच्या व्हेरियंटची विक्री खूपच कमी झाली होती. त्यामुळे या कारला डिसकंटिन्यू करण्यात येत आहे. सँट्रो आणि ग्रँड आय १० निओस च्या व्हेरियंट्सला डिसकंटिन्यू केले जात आहे ते सर्व लिमिटेड एडिशन मॉडल होते.

कंपनीने सर्व डिलरना सांगितले आहे की, Venue, Santro आणि Grand i10 NIOS च्या या व्हेरियंट्सचा जितका स्टॉक आहे. त्याची बुकिंग करा. नंतर कारची विक्री पूर्णपणे बंद केली जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.