नवी दिल्ली : भारताच्या ऑटो सेक्टरसाठी गेल्या वर्षाची सुरुवात निराशाजनक होती, पण लॉकडाऊन हटल्यानंतर आणि सणासुदीच्या काळात पुन्हा चांगले दिवस आले आहेत. यामध्ये एक मोठा बदल झालेला आहे. देशातील सर्वात मोठी कार कंपनी Maruti Suzuki ला जबरदस्त दणका बसला आहे. कारण मारुती ‘स्विफ्ट’च्या पुढे Hyundai Motors ची क्रेटा टॉप वन ठरली आहे. तर मारुतीची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.
सध्या जी गाडी ग्राहकांच्या सर्वाधिक पसंतीस उतरली आहे ती म्हणजे Hyundai Creta. गेल्या महिन्यात Hyundai च्या क्रेटाने एक वेगळा रेकॉर्ड आपल्या नावे केला. ह्युंडाईची ही दमदार SUV मे महिन्यात देशातील सर्वाधिक विक्री होणारी गाडी ठरली.
यासोबतच ह्युंडाईने देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीला जबरदस्त दणका दिला आणि कधी नव्हे ते मारुतीने आपलं पहिलं स्थान गमावलं. मारुतीची लोकप्रिय कार स्विफ्टवर मात करत क्रेटा मे महिन्यातील देशातील सर्वाधिक लोकप्रिय कार ठरली. मे महिन्यात देशात ७५२७ क्रेटाची विक्री झाली, तर मारुतीने ७००५ स्विफ्ट कार विकल्या.