जनतेची लोकभावना, पाठिंबा याच्या जोरावर मी निवडणुकीला सामोरे जातोय : राहुल कलाटे

माघार नाहीच; आता लढायचे; फटाक्यांची आतषबाजी करुन कार्यकर्त्यांकडून निर्णयांचे स्वागत

0

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक ही तिरंगी होणार हे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांच्या विनवी नंतरही शिवसेनेचे बंडखोर नेते राहुल कलाटे यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे आता चिंचवडची निवडणूक रंगतदार होणार आहे. जनतेची लोकभावना आणि जनतेचा असलेला पाठिंबा या जीवावर मी निवडणुकिला सामोरे जाणार असल्याचे उमेदवार राहुल कलाटे यांनी सांगितले.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्या भेटीला आले आहेत. शिवसेना नेते सचिन अहिर अहिर हे काही वेळापूर्वीच वाकड येथील कलाटे यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. चिंचवड पोटनिवडणुकी करिता उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. यानंतर राहुल कलाटे कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

महाविकास आघाडीने राष्ट्रवादीचे नाना काटे यांना उमेदवारी दिल्यामुळे या निवडणुकीत सेनेचे राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कलाटे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता आहे. म्हणूनच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राहुल कलाटे यांची मनधरणी करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू होते.

यापूर्वी राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेते स्थानिक नेत्यांनी कलाटे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यानंतरही कलाटे आपल्या बंडखोरीवर ठाम होते. आता आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने नेते सचिन अहिर हे राहुल कलाटे यांची मनधरणी करण्यासाठी वाकड येथे आले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक नेते उपस्थित आहेत. आता या भेटीनंतर राहुल कलाटे नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

राहुल कलाटे यांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना सुरुवातीला श्रद्धांजली वाहिली. चिंचवड मतदार संघातील मतदार हे माझ्या पाठीशी आहेत. सर्व क्षेत्रांतील नागरिकांशी मी आज सकाळ पासून बोलत आहे. सर्वांचे मत होते की लढायला हवे. त्यामुळे मतदार आणि नागरिकांचा आदर राखत मी निवडणूक लढवत आहे, असे कलाटे म्हणाले. 

Leave A Reply

Your email address will not be published.