”औरंगाबादकरांसाठी मी श्रीखंड्या होण्यासही तयार”

0

औरंगाबाद ः ”होय, मी घरी बसून काम करीत होतो. मीच नागरिकांना घरी राहा, असा सल्ला दिला होता. घरी बसून काम केल्यामुळेच आज हजारो कोटी रुपयांच्या विकासकामांते भूमिपूजन होत आहे”, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांनी लगावला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गरवारे क्रीडा संकुलावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १६८० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे आभासी पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले. २५ कोटी रुपये खर्चाच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे भूमिपूजनाचे उद्घाटन रिमोट दाबून काम कण्यात आले. तसेच रस्ताच्या कामांचे आणि सफारी पार्कचे उद्घाटनही करण्यात आले.

”शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाते शहराशी अतूट होते आणि म्हणून हे नाते घट्ट करण्यासाठी मी येथे आलोय. पैठणमध्ये एकनाथ महाराजांचे शिष्य श्रीखंड्या यांनी कवडीमधून पाणी आणून हौद भरला होता. औरंगाबादमधील लाखो लोकांची तहान भागविण्यासाठी मी श्रीखंड्या होण्यासही मी तयार आहे”’, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.