पिंपरी : मी या एरियाचा भाई आहे असे म्हणत एका तरुणाला कोयत्याने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनीअटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 13) दुपारी पावणे पाच वाजताच्या सुमारास मोशी येथे घडली.
भूषण गणेश बहिरट (21, रा. तुपेवस्ती, मोशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दिव्यांक मारुती तलवार असे जखमी तरुणाचेनाव आहे. याप्रकरणी दिव्यांक यांचा भाऊ मयूर तलवार (32, रा. मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिलीआहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मयूर आणि त्यांचा भाऊ दिव्यांक हे त्यांच्या महाराष्ट्र कोटिंग या स्प्रे पेंटिंगच्या दुकानातबसले होते. त्यावेळी आरोपी कोयता घेऊन तिथे आला. ‘मी या एरियाचा भाई आहे. तू माझी गाडी आताच्या आता माझ्या ताब्यात दे. नाहीतर माझे पैसे दे‘ असे म्हणत तो मयूर यांच्या अंगावर आला. त्यावेळी त्यांचा भाऊ दिव्यांक हा मध्ये आला असता आरोपीने त्याच्याडोक्यात कोयत्याने मारून जखमी केले. त्यानंतर हवेत कोयता फिरवून मोठमोठ्याने शिवीगाळ करत परिसरात दहशत निर्माण केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.