पुणे : इंजिनीअरिंगचं शिक्षण इंग्रजी करणे अनेक विद्यार्थांना कठीण जाते, त्यामुळे डिग्री पूर्ण करणं स्वप्न राहून जाते. मात्र आता इंजिनीअरिंगच्या विद्यार्थांसाठी खुशखबर असून आता विद्यार्थी मराठीमध्ये शिक्षण घेऊ शकतात. तसेच यासाठी विद्यापीठाने देखील मान्यता दिली आहे.
पुणे विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने सीओईपीच्या तीन अभ्यासक्रमांना, पिंपरी चिंचवड ऑफ इंजिनीअरिंगच्या एका अभ्यासक्रमास मराठी माध्यमामध्ये सुरू करण्याची मान्यता दिली आहे. त्यासंबंधीचे परिपत्रक सोमवारी शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव एम. व्ही. रासवे यांनी काढले आहे.
एआयसीटीईने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देशभरातून 14 महाविद्यालयांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यात राज्यातून मराठी माध्यमातून शिक्षण देण्यासाठी सीओईपी, पुणे आणि पिंपरीचिंचवड इंजिनीअरिंग कॉलेजांनी प्रस्ताव पाठविला होता. मराठीतून अभियांत्रिकीसाठी साहित्य निर्माण केले जाईल.
दरम्यान, ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी इंग्रजीच्या भीतीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. अशा विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणाची संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ‘एआयसीटीई’ने हा निर्णय घेतला आहे.