मुंबई : केंद्रीय एजन्सींना हाताशी धरुन महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा भाजपचा डाव आहे, असा थेट आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ED आणि Income Tax विभागाला मी 50 नावं दिली आहेत. पण त्यांनी अद्याप काही केललं नाही. एक जबाबदार खासदार सांगत आहे, माहिती देत आहे, त्याच्याकडे लक्ष द्यावं असं आपल्या सेंट्रल एजन्सीजला वाटत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.
आयटी आणि ईडीच्या धाडी कुणाच्या इशाऱ्यावर चालल्या आहेत, हे लवकरच शिवसेना जाहिर करेल, असेही संजय राऊत म्हणाले. किरीट सोमय्या यांनी बोगस कंपन्यांची लिस्ट दिली. त्यांच्या 75 बोगस कंपन्यांची मी दिली आहे. त्याचं काय झालं ? असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्राचा भाजपचा बडा नेता मोठ्या घोटाळ्यात अडकला आहे.
मुंबईतल्या ट्रायडंट ग्रुपचं नाव घेत राऊत म्हणाले, मी याबाबत आधी पंतप्रधानांना लिस्ट देणार आणि मग तुम्हाला सांगणार, असे राऊत म्हणाले.
शिवसेना खासदार संजय राऊत पत्रकार परिषदेत नेमक्या कुठल्या विषयावर गौप्यस्फोट करतात याची उत्सुकता होती.
पत्रकार परिषदेपूर्वी त्यांनी एक ट्विट करुन निशाणा साधला होता. तुम्हे हम भी सताने पर उतर आएं तो क्या होगा, हमें बदनाम करते फिर रहे हो अपनी महफिल मे… अगर हम सच बताने उतर आये तो क्या होगा, असं राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
मार्चमध्ये मोठा गौप्यस्फोट करणार, असं पूर्वीही राऊत यांनी सांगितले होतं. आता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अनेक मंत्री आणि नेत्यांच्या घरावर आयटी, आयकर विभाग तसंच ईडीचं छापेसत्र सुरु असताना राऊत यांची पत्रकार परिषद झाली. किरीट सोमय्यांना अटक करु असं म्हणत राऊत यांनी सोमय्या आणि भाजपवर जोरदार टीका केली होती. ईडीचा ससेमिरा मागे लावण्याच्या धमक्या देऊ नका, तुमच्याही नाड्या आमच्या हाती आहेत, असं त्यावेळी ते म्हणाले होते.