अश्लील व्हिडिओ बनवून प्रोफेसरकडे मागितली 10 लाख रुपयांची मागणी

0

नवी दिल्ली : एका प्रोफेसरचा अश्लील व्हिडिओ बनवून त्यांच्याकडे एका तोतया महिला पत्रकाराने 10 लाख रुपयांची मागणी केली. हा प्रकार उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे घडला आहे.

व्यवसायाने प्रोफेसर असलेल्या एका व्यक्तीकडे एका महिलेने अज्ञात नंबरवरून फोन केला. त्यानंतर त्या महिलेचा फोन सातत्याने येऊ लागला आणि या दोघांचे फोनवरून बोलणेही सुरुच होते. एका दिवशी महिलेने तिचा मुलगा आजारी असल्याचे कारण देत प्रोफेसरला घरी बोलावले. पण तिथे आधीपासून दोघेजण होते.

त्यानंतर प्रोफेसरला बंधक बनवून त्यांचे कपडे काढले आणि त्यानंतर महिलेने अश्लील व्हिडिओ बनवला. संबंधित महिलेने दोन साथीदारांसोबत मिळून लुटण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये 10 लाख रुपये मागितले आणि जर नाही दिले तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

दरम्यान, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी या महिलेने दिली. तसेच महिला आणि तिच्या साथदारांनी पत्रकार असल्याचे सांगत मीडियामध्ये हा व्हिडिओ लावण्याची धमकीही दिली. या प्रकारानंतर प्रोफेसरने पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.