”साडी नेसून नौटंकी करणार अनेक पाहिले”

0

कोल्हापूर ः ”राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर एका दिवसांत धनगर समाजाला  एका दिवसांत आरक्षण देतो म्हणणाऱ्यांनी पाच वर्षांत या समालाजा आरक्षण दिले नाही, तरीही गोपीचंद पडळकर आमदार झाले, मग तो कोणाचे चमचे आहे म्हणून त्यांना हे बक्षीस मिळाले”, असा प्रश्न ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित केला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊत यांच्यावर पत्र लिहून केलेल्या टीका समाचार घेताना मुश्रीफ म्हणाले की, ”सहा वर्षांपूर्वी पडळकर यांनी बारामतीमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन केले, त्याचे कौतुक चंद्रकांत पाटील यांनी केले आणि सत्ता येताच पहिल्याच दिवशी आरक्षण देऊ, अशा घोषणा केली होती पाच वर्षे त्यांनी आरक्षण दिले नाही, आश्वासन पूर्ण केले नाही, आमदारकी मिळाली, यावरून ते कोणाचे चमचे आहे हे स्पष्ट होते.
”साडी नेसून नौटंकी करणारे अनेक जण पवारांनी पाहिले आहेत. त्यांची दखल घेण्याची आम्हाला गरज वाटत नाही. पडळकर जरी बोलत असले तरी त्यांच्या बोलविता धनी वेगळा आहे, त्यांना आवरा, असा इशाराही मुश्रीफ यांनी दिला आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.