अजितदादांना मुख्यमंत्री झालेले बघायचे आहे : खासदार कोल्हे

0

पिंपरी : राज्याच्या मुख्यमंत्री पदी ‘अजितदादांना’ झाल्याचं मला बघायचं आहे, ही भावना आपण सर्वांनी ठेवून त्यांच्या पाठिशी ताकद उभी करणं, हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. असं विधान शिरुरचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी केले. ते च-होलीतील भोसरी विधानसभा कार्यकर्ता आढावा बैठकीत बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक अजित गव्हाणे, मंगला कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कोल्हे म्हणाले की, माझ्यासाठी तुम्ही जीवाचं रान केलं, पायाला भिंगरी लावून काम केलं. आता मला तुमच्यासाठी काहीतरी करण्याची वेळ आली आहे. शरद पवार हे पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घालत आहेत. त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळतंय ही भाग्याची गोष्ट आहे. पण त्यांना जर देशाच्या पंतप्रधानपदी शरद पवारांना पाहायचं असेल तर त्यांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष घालायला लागू नये. यासाठी कार्यकर्त्यांची फळी, नेत्यांची मोट बांधून झुंजार अन् लढाऊ वृत्ती काय असते. हे आपण साहेबांना दाखवून दिली पाहिजे, असंही कोल्हे यांनी म्हणाले.

हीच गोष्ट राज्यपातळीवर अजित पवारांच्या बाबतीतही आहे. पिंपरी चिंचवड शहराचा कायापालट करणाऱ्या अजितदादांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा आता ऋण फेडण्याची वेळ आली आहे. अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडसाठी कित्येक गोष्टी केल्या आहेत. त्यांच्या ऋणातून उतराई होण्याची हीच वेळ आहे. अजित पवारांच्या कुशल नेतृत्वात आंतरराष्ट्रीय पातळीवर पिंपरी-चिंचवड शहराची ओळख झाली. आता आपण सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी दादांना काहीतरी देण्याची वेळ आली आहे. त्या नेतृत्वाकडून आणखी अपेक्षा करण्यापेक्षा त्या नेतृत्वाला आणखी बळ देण्याची गरज आहे, असंही कोल्हे म्हणाले.

शिरुरच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन कार्यक्रमाला अजित पवारांच्या सोबत होतो. ते त्या इमारतीचा कोपरा ना कोपरा पाहत होते. मी त्यांना न्याहाळत होतो. त्यावेळी मनात विचार आला की, याच पद्धतीनं अजित दादांनी पिंपरी चिंचवड शहराची सूत्रे हातात असताना इथली प्रत्येक गोष्ट न्याहाळली असेल. पुन्हा हा योग पिंपरी चिंचवड शहरात कधी येणार? पिंपरी चिंचवडचा कायापालट करणाऱ्या अजित दादांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा मला माझ्या नेत्याला राज्याच्या मुख्यमंत्री पदी बसलेलं बघायचंय, ही माझी भावना आहे, असं ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.