मौजमजेसाठी करत होते दुचाकी, मोबाईलची चोरी…

0

पिंपरी :  चिंचवड पोलिसांनी मौजमजा आणि फिरण्यासाठी दुचाकी आणि मोबाइलची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्याकडून 5 दुचाकीसह 6 मोबाईल असा एकूण तीन लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

विरेंद्र उर्फ बेंद्या भोलेनाथ सोनी (22 रा. चिंचवडे कॉलनी नं.3, वाल्हेकरवाडी, चिंचवड), आशिष ओमप्रकाश परदेशी (20 रा. तुळजा भवानी मंदिराजवळ, आकुर्डी) असे अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपींची नावे आहेत.

चिंतामणी चौकाजवळील मोकळ्या जागेत दोघेजण संशयीतरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्या ठिकाणी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या अॅक्टीव्हा गाडी बाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली.

चौकशी दरम्यान त्यांनी मौजमजा आणि फिरण्यासाठी निगडी, चिंचवड, वाल्हेकरवाडी येथून पाच दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तसेच चिंचवड आणि वाल्हेकरवाडी येथील उघड्या घरांमधून मोबाईल चोरल्याची कबुली दिली.

पिंपरी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे, चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर काटे, पोलिस निरीक्षक गुन्हे विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने ही कामगिरी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.