सातारा ः ”मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती मी उठविण्याचा प्रयत्न करणार आहे”, असे आश्वसन राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी सातारा दौऱ्यात असताना दिले.
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीसाठी गुरुवारी सातारा येथे शरद पवार आले आले होते. बैठक पार पाडल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि इतर काही संघटनांनी पवारांची भेट घेतली. त्यावेळी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविण्यासाठी शरद करावेत, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले.
शरद पवार यावेळी म्हणाले की, ”मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी मी गेली अनेक वर्षे प्रयत्न करत आहे. परंतु, त्यात सतत अडचणी येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहे.
यापूर्वी राज्यसभा सदस्य उदयन राजे भोसले यांनी शरद पवारांवर मराठा आरक्षणावरून टीका केली होती. मंडल आयोगावेळी मराठा समाजाचा विचार का केला नाही, सत्तेत असलेल्यांनी हा प्रश्न का सोडविला नाही, असे प्रश्न उपस्थित केले होते.