पुणे : आय सी लीफ या अद्यावत प्रयोग शाळेचे उदघाटन दापोली कोंकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एस. डी सावंत, ऍग्रीकलचर रीसर्च ऑरगनायझेशन इस्राईलचे प्रोफेसर उरी येर्मियाहु, सेंटर फॉर प्लॅन्ट नुट्रीशन अँड फर्टीलायझेशन इस्राईलचे डॉ. मेणाकेम असराफ, पीक सल्लागार इस्राईलचे श्री सगी कात्झ आणि श्री लिरान शमियुल तसेच आय सी एल इंडिया चे सी इ ओ तथा प्रेसिडेंट श्री. अनंत कुलकर्णी आणि हेड स्ट्रॅटेजि इम्प्लिमेंटेशन अँड डिमांड जनरेशन श्री ओंकार नाथ यांच्या शुभ हस्ते भुकूम पुणे येथे करण्यात आले.
आय सी लीफ या प्रयोगशाळेत अद्यावत एक्स आर एफ (एक्स रे फ्लुरोसन्स) आणि एन आय आर (निअर इन्फ्रारेड स्पेसिट्रोस्कोपी) यासारख्या अद्यावत यंत्राच्या साह्याने पिकांच्या पानांची तपासणी करून विविध अन्नद्रव्यांचे प्रमाण समजणार आहे आणि यावरून पीक सल्लागार च्या माध्यमातून शेतकऱ्यांना तांत्रिक अहवाल देण्यात येणार आहे. पीक सल्लागार अहवालावरून विविध अन्नद्रव्यांच्या कमतरता तर निश्चितच दूर केल्या जातील याशिवाय पीक वाढीच्या विविध अवस्थांमध्येय अन्नद्रव्य व्यवस्थापन पिकास हवे तेवढेच द्या जास्त हि नाही कि कमी हि नाही या नुसार अचूकपणे करता येणार आहे.आधीच्या प्रचलित वेट केमिस्टरी पेक्षा या पद्धतीने अचूकपणे व जलदपणे पानातील अन्नद्रव्यांचे निदान व पिकांचे खत व्यवस्थापन करणे आता अतिशय सोपे झाले आहे. खरंच पानं आपल्याशी बोलू शकतील का तर निश्चितच या आय सी लीफ च्या माध्यमातून हे आता सहज शक्य झाले आहे. अशी माहिती आय सी एल इंडिया चे प्रमुख शास्त्रज्ञ श्री संजय बिरादार यांनी या वेळी दिली.
आय सी लीफ आणि पीक सल्लागार – आय सी एल इंडिया चा लोकार्पण सोहळा हॉटेल सयाजी इंटरनॅशनल वाकड पुणे येथे संपन्न
आय सी एल इंडिया द्वारा आय सी लीफ पर्ण परीक्षण आणि पीक सल्लागार या संगणकीय टूल चे लोकार्पण दापोली कृषी विदयापीठाचे कुलगुरू डॉ. एस. डी. सावंत तसेच दापोली कृषी विदयापीठाचे,माजी कुलगुरू डॉ. के. इ. लवांदे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वाय. एस. नेरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या लोकार्पण सोहळ्यात संबोधन करत असताना कुलगुरू डॉ. एस. डी. सावंत म्हणाले कि पानांची तपासणी एक्स आर एफ व एन आई आर सारख्या अद्यावत तंत्रज्ञानाद्वारे अचूक पणे करणे आता सहज शक्य झाले आहे. ए आर ओ तसेच सी एफ पी एन च्या तांत्रिक सहकार्याने हे तंत्रज्ञान इस्राईल हुन भारतात आणले गेले हे विशेष. आधीच्या वेट केमेस्ट्री पेक्षा सुलभ, सोपे, अति जलद आणि अचूकपणे पानांची तपासणी करून विविध अन्नद्रव्यांच्या कमतरता समजून घेऊन नेमकेपणाने अन्नद्रव्यांचे/खतांचे व्यवस्थापन करणे आता सहज शक्य झाले आहे. आय सी लीफ च्या माध्यमातून पानांची तपासणी करून पीक वाढीच्या गरजांनुसार तसेच अपेक्षित उत्पादन घेण्यासाठी पीक सल्लागार हे टूल सुद्धा शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे. भविष्यामध्ये याचा फायदा हा शास्वत उत्पादन घेण्यासाठी तर होणारच आहे शिवाय याच्या माध्यमातून जमिनीचे आरोग्य हे सुद्धा चांगल्या प्रकारे जपता येणार आहे.
कुलगुरू डॉ. के. इ. लवांदे यांनी आय सी एल च्या शेती व शेतकऱ्यांचा कायापालट करणाऱ्या या इस्रायली तंत्रज्ञानाचा फायदा हा आता भारतीय शेतकऱ्यांना होऊन त्यांचे उत्पादन, उत्पादकता व शेतमालाची गुणवत्ता वाढवून अन्नद्रव्यांवरती नेमकेपणाने खर्च करून निव्वळ नफा वाढवता येणार आहे असे नमूद केले.
आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वाय. एस. नेरकर यांनी हे तंत्रज्ञान भारतीय शेतीस निशचित पणे एक नवी दिशा देणारे ठरेल असा विश्वास व्यक्त केला आणि आय सी एल च्या सर्व उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.
प्रो. उरी येर्मियाहु ए आर ओ (ऍग्रीकल्चर रिसर्च ऑर्गनायझशन) इस्राईल यांनी बोलताना नमूद केले कि आय सी लीफ हे पाने तपासणीचे अद्यावत तंत्रज्ञान हे भारतीय शेतकऱ्यांना पर्वणी ठरणार असून शेतकऱ्यांना अचूक निष्कर्षाद्वारे नेमकेपणाने अन्नद्रव्य व्यवस्थापन करता येणार आहे. एक्स आर एफ व एन आई आर हे अतिविशेष मशीन द्वारे घेतल्या जाणाऱ्या नोंदी या अचूक असणार असून त्याचा फायदा हा सर्व सामान्य शेतकऱ्यांना होणार असल्याबद्दल त्यांनी माहिती दिली. इस्राईल सोबत आता भारत पण शेती क्षेत्रात अति प्रगत वाटचाल करेल अशी खात्री त्यांनी यावेळी बोलताना दिली.
डॉ. मेनाखेम असराफ, रिजनल ऍग्रोनॉमिस्ट सी एफ पी एन (सेंटर फॉर प्लॅन्ट नुट्रीशन अँड फर्टिलायझेशन) च्या तांत्रिक सहकार्याने या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा विकास करण्याबद्दल माहिती दिली तसेच सी एफ पी एन द्वारे चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती या कार्यक्रमात त्यांनी दिली. आय सी लीफ हे तंत्रज्ञान सर्वार्थाने भारतीय शेतीस एक नवी दिशा देणारे ठरेल असे सांगितले.
सगी कात्झ आणि श्री लिरान शम्युएल यांनी क्रॉप ऍडव्हायजर या टूल बद्दल सविस्तर माहिती दिली. आय सी एल द्वारा या कंपनीची स्थापना २०२१ मधेय करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली क्रॉप ऍडव्हायजर च्या माध्यमातून शेतकऱ्यास नेमकेपणाने तसेच आवश्यकतेनुसार खत व्यवस्थापन करता येणे शक्य होणार असल्याची त्यांनी माहिती दिली. माहिती तंत्रज्ञान, ऐतिहासिक डेटा, सॅटेलाईट, हवामान आदींचा फायदा हा आता शिफारशींमध्ये करता येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. श्री लिरान शम्युएल यांनी या टूल चा वापर नेमका कसा करावयाचा याचे प्रात्यक्षिक या वेळी करून दाखवले.
अनंत कुलकर्णी, सी ई ओ तथा प्रेसिडेंट आय सी एल इंडिया यांनी या वेळी आय सी एल द्वारे चालवण्यात येणाऱ्या उपक्रमांबद्दल तसेच उत्पादनांबद्दल माहिती देऊन याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा असे आव्हान या वेळी केले.
ओंकार नाथ हेड स्ट्रॅटेजि इम्प्लिमेंटेशन अँड डिमांड जनरेशन यांनी सर्वांचे स्वागत केले आणि डिजिटल माध्यमातून आणि संगणकीय टूल येणाऱ्या काळात शेती साठी वरदान ठरतील असे मत यावेळी व्यक्त केले.
संजय बिरादार प्रमुख शास्त्रज्ञ आय सी एल इंडिया यांनी या वेळी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमास शेती क्षेत्रातील विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली