घरातील व्यक्तीला करोना संसर्ग झाला तर… 

अशी घ्यावी घरातील सर्व सदस्यांनी आरोग्याची काळजी

0
यंदाचे वर्ष करोना महामारीने गिळंकृत केलेले आहे. आपल्या घरामधील एखादा सदस्य करोना पाॅजिटिव्ह निघाला तर, सर्व सदस्यांना काळजी वाटू लागते आणि जर घरातच त्या सदस्यावर उपचार सुरू असतील तर, आणखीच काळजी वाटू लागते. पण, हिंमत हारू नका. खास करून त्या सदस्यासमोर तरी मूळीच हिंमत हारू नका. या कठीण परिस्थितीत सर्वांनी सर्वांच्या आरोग्याची काळजी घ्या. कारण,  अशा परिस्थितीत डोक्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. जसं की, आता घरातील सर्व सदस्यांनी मास्क घालावा लागणार, प्रत्येक वस्तूला सॅनिटाईज करावे लागणार, असे अनेक प्रश्न समोर उभे राहतात. आपण, या प्रश्नांची उत्तरे समजावून घेऊ या… 
घरातील सर्व सदस्यांनी करोना चाचणी करावी का? 
जर कुणी एखादा घरातील सदस्य करोना पाॅजिटिव्ह निघाला, तर सर्वाच्या डोक्यात पहिला प्रश्न येतो तो म्हणजे आपणही करोना चाचणी करून घ्यावी का? तज्ज्ञांच्या मतानुसार… जर तुमच्या घरातील सदस्य करोना आढळला असेल. परंतु तुम्ही त्याच्या संपर्कात आला नसाल आणि रुग्णाबरोबर रुग्णाच्या जागी बसला असाल तर, करोनाचा चाचणी करून घेणे, उत्तम आहे. भले तुमच्यात लक्षणे असोक किंवा नसोत.
घर आतून संपूर्ण बंद करायचं का? 
करोना सापडलेल्या घरात ही एक मोठी समस्या आहे की, घर बंद ठेवायचे का? काही संशोधनातून समोर आलेल आहे की, हा संसर्ग हवेतून होतो. म्हणून लोक संशय मनात बाळगून असतात. परंतु, करोना पाॅजिटिव्ह रुग्णाला स्वच्छ आणि खुल्या हवेची आहे. त्यासाठी घराचे दरवाजे आणि खिडक्या उघड्या करून ठेवाव्यात, जेणे करून रुग्णाचे आरोग्य लवकर बरे होईल.
रुग्णाला जेवण देण्यासाठी जाऊ शकतो का? 
हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर, करोना रुग्णाल जेवण द्यायचे असेल तर, सहा फुटाचे अंतर ठेवून द्यायला हवे आणि ते देताना हातात ग्लोज घालायला हवेत. योग्य अंतर ठेवून करोनाबाधील रुग्णाला म्हणजेच घरातील सदस्याला जेवण द्यायला हवे.
सॅनिटायझर वापर करावा की फक्त हात धुवावे?
जर एखादी वस्तू देताना तुमचा रुग्णाच्या कोणत्या वस्तूला हात लागला असेल तर फक्त साबणाने २० सेकंदापर्यंत हात धुवावेत. आणि जर तुम्हाला हात धुणे शक्य नसेल तर सॅनिटायझर वापरावे.
कोणत्या वस्तूंवा करावे लागते सॅनिटायझर? 
करोना रुग्ण आढळला असेल तर, घरातील सर्व वस्तूंना सॅनिटायझर करावे. घरातील लाईट, रिमोट, वाॅशरुम, टेबल, खुर्ची आदी वस्तूंना सॅनिटायझ करावे. तसेच प्लाॅस्टिक, लोखंड आणि स्टिलच्या वस्तूंवर जास्त वेळेपर्यंत विषाणू राहतात. त्या वस्तूदेखील सॅनिटायझ करून घ्यावे.
मास्क वापरावे का? 
जर एखाद्या सदस्या करोना झाला असेल तर, इतर सदस्यांनी आपला चेहरा झाकलेलाच बरा. तो सुती कापडानेदेखील झाकला तरी चालेल. कारण, डाॅक्टरांच्या मतानुसार मास्क घालावाच. कारण, तुम्हालाही माहीत नसते की, तुम्ही संक्रमित आहात की नाही. त्यासाठी मास्क घालणे हाच उत्तम पर्याय आहे.
घरातील कपड्यांनाही वेगळे करावे लागेल का? 
जसे आपल्याला कळते की, घरातील एका व्यक्तीला करोना झाला आहे. तर ताबडतोब हातात ग्ल्वोज घालून रुग्णाच्या कपड्यांना वेगळे करा आणि त्या कपड्यांचा वापर करू नका. दोन दिवस तसेच कपडे ठेवा. कारण, कपड्यांवरही दोन दिवस विषाणू राहतात.
घरातून बाहेर पडायचे की नाही?
महत्वाचे असेल की, तुमच्या काळजी बरोबर इतरांच्या आरोग्याचा विचार केला असावा. जरी तुम्हाला करोनाची लक्षणे दिसत नसली तरी घरातून बाहेर पडू नका. कारण, असही होऊई शकतं की नंतर तुमच्यामध्ये करोनाची लक्षण आढळून येतील. त्यामुळे तुम्ही दुसऱ्यांही संक्रमित कराल. शेजारी, नातेवाईक किंवा दोस्तांकडून तुम्ही तुमची बाहेरची काम करून घ्या.

 

राधिका पार्थ

Leave A Reply

Your email address will not be published.