‘भारत जिंकला तर मी पुन्हा कपडे उतरवू का?’

0

मुंबई : चित्रपट आणि टीव्ही विश्वातील स्पॉटबॉईजना धान्याची किट देण्यासाठी पूनम पांडे दोन दिवसांपूर्वी मुंबईत आली. यावेळी भारत विरुद्ध न्यूझीलंड अंतिम सामन्याविषयी पूनमला पत्रकारांनी प्रश्न विचारले, त्यावर ‘भारत जिंकला तर मी पुन्हा कपडे उतरवू का?’ असा प्रतिप्रश्न विचारत पूनमने सर्वांनाच बुचकळ्यात टाकलं.

भारताच्या विजयानंतर स्ट्रिपिंग, अर्थात कपडे काढण्याचं धाडस पूनम पांडे याआधीही करायला निघाली होती. 2011 मध्ये भारताने वर्ल्ड कप जिंकल्यास नग्न होण्याची घोषणा करत पूनमने लक्ष वेधून घेतलं होतं. तिची ही आवड लक्षात घेत पत्रकार परिषद काही जणांनी पूनमला या मुद्द्यावरुन छेडलं.

“क्रिकेट चालू आहे? लोक क्रिकेट खेळत आहेत? आणि हे होत असेल, तर टीम इंडिया यावेळी जिंकल्यास मी स्ट्रीप करेन, असं मी पुन्हा म्हणू का? मला याविषयी काही कल्पना नाही. मी घरी जाते. मी या कॉन्ट्रोव्हर्सीची शक्यता पडताळून पाहते” असं बिनधास्त उत्तर पूनमने दिलं.

पूनमच्या धाडसी उत्तरानंतर तिचा पती सॅम बॉम्बेने माईकचा ताबा घेतला. “मी स्ट्रीप करु का?” असा प्रश्न त्याने विचारला, त्यावर पूनमने त्याला “तुला कपडे उतरवायचे आहेत का? नको करुस, नाहीतर भारत हरेल” असं म्हणत कोपरखळी मारली.

Leave A Reply

Your email address will not be published.