जुही चावलावर सल्लूभाई  खूप प्रेम करत होता, पण…

0

मुंबई ः बाॅलिवुडमधील तरुणांच्या आवडीचा अभिनेता सलमान खानच्या लग्नाला घेऊन खूप चर्चा होत असते. सलमानने अजूनपर्यंत का लग्न केले नाही, हा एक मोठा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडलेला आहे. त्याच्या जुन्या मुलाखतीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जुही चावलाबद्दल बोलताना दिसत आहे.

सलमान जुहीवर प्रेम करायचा. इतका प्रेम करायची की, त्याने जुहीच्या वडिलांकडे लग्नाची मागणी घातली होती. सलमान ज्यावेळी जुहीच्या वडिलांकडे गेला आणि लग्नासाठी मागणी घातली, तेव्हा नेमके काय घडले याबद्दल सलमान या व्हिडीओत बोलत आहे.
सलमान जुहीच्या वडिलांशी म्हणाला की, “जुही खूप गोड आहे आणि प्रेमळ आहे, जुहीसोबत मी लग्न करू शकतो का?” तेव्हा जुहीच्या वडिलांनी  मला नकार दिला. कदाचित मी त्यांना आवडलो नसेल. त्यांना काय हवे होते माहीत नाही”, असे सलमानने मुलाखतीत सांगितले आहे.
आतापर्यंत सलमान आणि जुहीने अनेक चित्रपटांमध्ये एकत्रितपणे काम केले आहे. मात्र, मुख्य भूमिकेत ते कधीच एकत्र दिसले नाहीत. ‘दिवाना-मस्ताना’ या चित्रपटात पडद्यावर सलमानचे आणि जुहीचे लग्न झाले होते. पण, वास्तवात हे लग्न झाले नाही.
Leave A Reply

Your email address will not be published.