आपली मुले कॉलेजला जातात तर मग ‘या’ व्यवसानात अडकली तर नाहीत ना….

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई

0

पिंपरी : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उत्तेजक इंजेक्शन आणि गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला खंडणी विरोधी पथकानेपिंपरी येथून अटक केली. त्याच्याकडून 642 ग्रॅम गांजा आणि मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शनच्या 95 बाटल्या जप्त करण्यातआल्या आहेत.

रवी चंद्रकांत थापा (32, रा. पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यातआला आहे.

पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकातील पोलीस पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतवायसीएम हॉस्पिटल समोर गस्त घालत होते. त्यावेळी एक व्यक्ती संशयितपणे थांबला होता. पोलीस आल्याचे दिसताच तो पळून जाऊलागला. त्यानुसार पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे असलेल्या पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये 16 हजार 50 रुपये किमतीचा 642 ग्रॅम गांजा आणि 25 हजार 460 रुपये किमतीच्या मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शनच्या 95 बाटल्या आढळल्या. यासह पोलिसांनी आरोपीकडून दोन हजार रुपये रोखरकमेसह एकूण 43 हजार 510 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शन हे महाविद्यालयीन मुले जिममध्ये जास्तवेळ व्यायाम करता यावा तसेच शरीर चांगले दिसावे यासाठीयाचा उपयोग करतात. मात्र डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय (Pimpri) अशी औषधे घेणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे अशाऔषधांचे परस्पर सेवन करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ही कारवाई खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहायक निरीक्षक उद्धव खाडे, सहायक फौजदार अशोकदुधवणे, पोलीस अंमलदार रमेश गायकवाड, निशांत काळे, विजय नलगे, किरण काटकर, सुनील कानगुडे, प्रदीप गुट्टे यांच्या पथकानेकेली.

Leave A Reply

Your email address will not be published.