पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर….

0

मुंबई : पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर अजित पवार यांची काय लायकी राहिली असती, अशी जळजळीत टीका भाजप नेते निलेश राणे यांनी केली आहे.

अजित पवार यांनी रविवारी मराठा मोर्चा काढणाऱ्या नरेंद्र पाटील यांना लक्ष्य केले होते. यावरुन निलेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर पलटवार केला.

निलेश राणे यांनी ट्विट करुन अजित पवार यांना खडेबोल सुनावले. अजित पवार वाटेल तसं बडबडत असतात त्यात काही नवीन नाही. पण मराठा समाजासाठी काही जण आवाज उठवत आहेत त्यांचा आवाका मोजण्याचं धाडस अजित पवारांनी करू नये.

मराठ्यांचा अपमान करू नका, पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर तुमची लायकी काय झाली असती विचार करा, असे निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.