नवी दिल्ली ः पुन्हा एकदा भाजपाच्या खासदार प्रज्ञा सिंह यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. ”ब्राह्मणाला ब्राह्मण म्हंटलं तर वाईट वाटत नाही. परंतु, शुद्राला शुद्र म्हटलं की वाईट वाटतं. कारण, काय आहे ते समजत नाही”, असे वादग्रस्त विधान करून पुन्हा एकदा प्रज्ञा सिंह यांनी नव्या वादामध्ये ठिगणी टाकलेली आहे.
मध्यप्रदेशमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्या पुडे म्हणाल्या की, ”वैश्याला वैश्य म्हटलं तर वाईट वाटत नाही. क्षत्रियाला क्षत्रीय म्हटलं तरी त्याला वाटत नाही. पण, शुद्राला शुद्र म्हटलं की, वाईट का वाटतं. याचं कारण काय आहे, याचं कारण काय आहे हे समजू शकत नाही”, विधान प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले.
भाजपाचे नेते जे. पी. नड्डा यांच्यावर हल्ला झाला, त्यावरून ठाकूर यांनी प. बंगालच्या मुख्यमंंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाषा साधला. ”आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा विजयी होणार आणि हिंदू राज येणार आहे. आपली सत्ता संपणार असल्याची जाणीव झाल्यामुळेच ममता बॅनर्जी हताश झाल्या आहे”, अशी टीका त्यांनी केली.