अहमदनगर ः दिल्लीच्या सीमेवर होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही शेतकऱ्यांच्या मुलांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. त्यावेळी दिल्लीत आंदोलनासाठी जंतर मंतर किंवा रामलिला यांपैकी एक जागा मिळाली, तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शेवटचं आंदोलन करणार आहे, अण्णांनी सांगितलं आहे.
शेतकरी आंदोलनातच कोणतीही हिंसा नाही. अंहिसेच्या मार्गाने आंदोलन सुरू केले आहे. सरकराने पाच वेळा बैठक घेऊनही मागण्या मान्य केल्या नाहीत. मला लिखित आश्वासन देऊनही मागण्या मान्य केल्या नाहीत. आता कृषीमंत्री आश्वासने पूर्ण करणार का, असा प्रश्न अण्णा हजारे यांनी उपस्थित केला आहे.
मागील २५ दिवसांपासून पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात केंद्राशी लढत आहे. मात्र, कोणत्याही ठोस निर्णयापर्यंत केंद्र सरकार आलेलं नाही, त्यामुळे २७ डिसेंबरला ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या दिवशीच ‘थाळीनाद आंदोलन’ करण्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी केला आहे.