गुरुवारी मुंबई -पुणे प्रवास करणार आहात तर ही बातमी वाचा

0

नवी मुंबई : दरम्यान २४ जूनला प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. नवी मुंबईमध्ये २४ जूनला मोर्चा काढण्यात येत असल्याने नवी मुंबई हद्दीत येणार्‍या व जाणार्‍या सर्व प्रकारच्या जड अवघड वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद तसेच सायन -पनवेल महामार्गावरुन उरण फाटा ते खारघर दरम्यानच्या दोन्ही मार्गिकेवरील तसेच सीबीडी सर्कलकडे येणारे रस्ते, किल्ला जंक्शनकडून, सीबीडी महाकाली चौकाकडून, पार्क हॉटेलकडून व जुने महानगर पालिका कार्यालयाकडून या रस्त्यावरील सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

मुंबई -पुणे जाणारी हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग
मुंबईकडून येणारी वाहने ऐरोली टोलमार्गे -महापे, -शिळफाटा या मार्गाने कळंबोली सर्कलमार्गे पुण्याकडे जाईल. वाशी येथून पामबिच मार्गे – ऑरेजा सर्कल, बोनकोडे मार्गे, फायरब्रिगेड -महापेब्रिज – शिळफाटा मार्गे – कळंबोली सर्कलमार्गे पुण्याकडे जाईल.
मुंबई येणारी हलकी वाहनांसाठी पर्यायी मार्ग
एक्सप्रेसवेवरील वाहतूक पुरुषार्थ पेट्रोल पंप येथून उजवीकडे तळोजा एमआयडीसी कडे जाणारे रोडने रोपाली येथून डावीकडे वळण घेऊन शिळफाटा – महापे -एैरोली मार्गे मुंबईकडे जाईल.
जुना पुणे – मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्ग
पळस्पे फाटा – डी पाईट – कळंबोली सर्कल -शिळफाटा मार्गे – महापे -एैरोली टोल मार्गे मुंबईकडे जाईल.

नवी मुंबईमधून पुण्याकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्ग
पामबिच मार्गे – ऑरेजा सर्कल – बोनकोडे मार्गे, फायरब्रिगेट – महानेब्रिज मार्ग – शिळफाटा मार्गे – कळंबोली सर्कलमार्गे पुण्याकडे जाईल.
बेलापूर – ठाणे मार्गे फायरब्रिगेट – महापेब्रिज मार्गे – शिळफाटा मार्गे – मुंब्रा -पनवेल हायवेने पुण्याकडे जाईल.
हा बदल २४ जून रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत राहणार असल्याचे नवी मुंबईचे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.