पुणे ः पुण्यातील अलका चौक ते मंडई दरम्यान आंदोलकांतर्फे मोर्चा काढण्यात येणार होता. परंतु, पोलिसांनी परवानगी नाकारल्याने अलका चौकात आंदोलकांनी ठिय्या आंदोलन सुरु केले. या आंदोलनात शीख बांधव सहभागी झालेले असून ”अगर देश बचाना है, तो मोदी को हटना है”, अशा घोषण्या देण्यात आल्या.
मागील १२ दिवसांपासून पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश आणि इतर राज्यांमध्ये कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. चिवटपणे सुरु असलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांवर प्रारंभी अश्रुधूर आणि लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर बाॅलिवुडमधूनही मोठ्या प्रमाणात सेलेब्रिटीजनी पाठिंबा दर्शविला. देशभरातील किमान ५०० शेतकरी संघटनांनी हे शेतकरी आंदोलन सुरू ठेवले आहे. दरम्यान, केंद्र सरकारशी ४ वेळा बैठाकाही पार पाडल्या. मात्र, कोणत्याही निष्कर्षापर्यंत ही बैठक पोहोचली नाही.