पिंपरी : भारतीय जनता पार्टी पुनावळे आणि नवनाथ भाऊ ढवळे मित्र परिवार यांच्यावतीने घेण्यात आलेल्या ‘आरोग्य शिबिरास’ महिलांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. सुमारे 200 महिलांनी वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्य तपासण्या करुन घेतल्या.
पुनावळे येथील भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयात हे आरोग्य शिबीर घेण्यात आले. तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून सर्व तपासण्या करण्यात आल्या. या शिबीराचे उद्घाटन कृषीनिष्ठ पुरस्कार विजेते सुनिल ढवळे आणी भारतीय जनता पार्टी पिपंरी चिंचवड उपाध्यक्ष नवनाथ मारुती ढवळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कामगार नेते सुरेश रानवडे , भरत काटे, मल्हारी गोरगले, रोहिदास बोरगे, सुभाष कोयते, दिपक आरसुडे, पुनावळे जेष्ठ नागरीक संघातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.