पुण्यातील पाच मनाच्या गणपतीचे आज सकाळी विसर्जन

0

पुणे : पुण्यातील मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपतीचे विसर्जन झाले आहे. त्याचसोबत मानाच्या पाचही गणपतींचे परंपरेनुसार विसर्जन झाले. डेक्कन येथील महापालिकेच्या हौदामध्ये या पाचही मानाच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आलं असून यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे पहायला मिळालं. जवळपास 11 तास मिरवणुका चालल्या.

पुण्यातील पहिल्या मानाच्या कसबा गणपतीचे 4.15 मिनिटांनी तर मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीचं विसर्जन सायंकाळी 5.30 वाजता झालं. मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणपतीचे विसर्जन 7.22 मिनीटांनी झालं तर मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपतीचे विसर्जन 8.02 वाजता झाले. मानाचा पाचवा गणपती केसरीवाडी गणपतीचे विसर्जन रात्री 8.50 वाजता झालं. यावेळी लेझिम आणि ढोल-ताशांच्या गजरात अवघं पुणे दुमदुमल्याचं दिसून आले.

मानाच्या गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात झाली. भाऊ रंगारी गणपती मंडळाची विसर्जन मिरवणूकीत पाच ढोल ताशाचे पथक असणार आहेत. त्यामुळे दगडूशेठ हलवाई गणपती  बेलबाग चौकात पोहोचण्यास नेहमीपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. जिलब्या मारुती, भाऊ रंगारी, अखिल मंडई मंडळ यानंतर दगडूशेठ हलवाई गणपती बेलबाग चौकात येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.