मुंबई : अंबानी यांच्या घरा बाहेर स्फोटक असणारी गाडीचे प्रकरण चांगलेच तापत आहे. यामुळे महाविकासआघाडीची महत्त्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीत अजित पवार, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, अनिल परब सहभागी झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. सरकारने नेमंक या प्रकरणी काय भूमिका घ्यायची शरद पवारांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव आहे तो पाहता, मुंबई पोलीस दलातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच NIA कडून काही पोलीस अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलवलं जाण्याची शक्यता आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत सचिन वाझे प्रकरणी रणनीती ठरणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर 25 फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आली होती. या परिसरातली सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर 24 फेब्रुवारीला रात्री साधारण एक वाजता अंबानींच्या घराबाहेर दोन गाड्या आल्या होत्या. यापैकी स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके होती. ही गाडी पार्क केल्यानंतर चालक गाडीतून खाली उतरला होता. त्यानंतर मागून एक इनोव्हा कार आली त्यामध्ये बसून तो निघून गेला होता.
स्फोटके बाळगणे त्याचबरोबर अंबानी यांच्या बंगल्याशेजारी स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीला पार्क करण्याच्या गुन्ह्यात महत्त्वाची भूमिका असण्याच्या आरोपाखाली त्यांना बेड्या ठोकण्यात आल्यात. त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हेसुद्धा दाखल करण्यात आले आहेत.