नवी दिल्ली : लहान मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण लवकरच दोन वर्षे वयावरील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होणार असल्याची माहिती दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली आहे.
जर PFizer-BioNTech च्या लसीला भारतात हिरवा कंदील मिळाला या लसीचा देखील लहान मुलांसाठी पर्याय असू शकेल, असंही डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं.
दिल्ली एम्सनं यापूर्वीच लहान मुलांवरील ट्रायल सुरु केली आहे. ७ जूनला ही ट्रायल सुरु झाली असून यामध्ये २ ते १७ वयोगटातील मुलं सहभागी झाली आहेत.
दरम्यान, DCGIनं लहान मुलांसाठी भारत बायोटेकला १२ मे रोजी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील कोव्हॅक्सिन लसीच्या ट्रायल्सला परवानगी दिली आहे.