प्रसन्न चिंचवडे (१९, रा. चिंचवड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रसन्न याने त्याच्या वडिलांच्या पिस्तूलातून स्वतःवर गोळी झाडून घेतली.
प्रसन्ना याला तात्काळ उपचारासाठी थेरगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चिंचवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. गोळी झाडून घेण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. प्रसन्न हा नगरसेविका करुणा चिंचवडे यांचा मुलगा आहे.