पाच वर्षात प्रभागात विकासाची गंगा आली – एकनाथ पवार

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना भडकविण्याचे काम अनेक राजकीय पक्षांनी केले आहे. गेली पंचवीस वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारून या शहराला लुटण्याचे काम केले. गेल्या पंचवीस वर्षात विकासाचा रथ पहिला नव्हता तो या पाच वर्षात भाजपच्या माध्यमातून सर्व जनतेला पाहायला मिळाला, असे वक्तव्य पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी सत्तारूढ पक्षनेते, विद्यमान नगरसेवक एकनाथ पवार यांनी शुक्रवारी (दि.15) केले. प्रभाग क्रमांक अकरामधील श्री सिद्धिविनायक नवरात्र उत्सवाच्या रावण दहन कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी मुख्य आयोजक विक्रमादित्य पवार, अन्नधान्य महामंडळ सल्लागार समितीचे सदस्य पोपट हजारे, भाजपा शहर उपाध्यक्ष अजय पाताडे, निगडी चिखली मंडल अध्यक्ष महादेव कवितके, प्रभाग अध्यक्ष संतोष ठाकूर, श्रीकांत कदम, बाळासाहेब गंगावणे, गोरक पाटील, भाजपा उद्योग आघाडीचे अध्यक्ष अनिल माने, अनिकेत बाबर, हिंदुराव पाटील, हरजीत बारदा, सुदीप नायर, प्रमोद कऱ्हाडे, सूर्यकांत शेंडे, आनंदा यादव, शशिकांत जगताप, नामदेव पवार, सुनील डोमटे, ऐश्वर्या पवार, सुनिता जगताप, कविता हिंगे, दिपाली धानोरकर, प्रीती कुलकर्णी, अक्षता पाताडे, मनाली पाताडे, धनश्री बेंडखळे, अर्चना पाटील, सोनाली हजारे, आरती गंगावणे, सपना पाटील, योगिता केदारी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोनाचे नियम पाळून पूर्णानगर येथील शनिमांदिर मैदानावर रावण दहनाचा कार्यक्रम विक्रमादित्य पवार यांनी आयोजित केला.
एकनाथ पवार म्हणाले की, पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता 2017 ला प्रचंड बहुमताने प्रस्तापित झाली. गेली कित्येक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेत सर्वसामान्य नागरिकाच्या कररुपी पैशावर डल्ला मारला, ती साफसफाई करण्याचे काम पिंपरी चिंचवड शहरातील भाजप करीत आहे. प्रभाग क्रमांक 11 विकासकांमापासून कित्येक वर्षे वंचित होता. महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर या पाच वर्षात विकासाचा रथ सर्वसामान्य नागरिकांना पाहायला मिळाला. प्रभागात प्रशस्त रस्ते, वीज, पाणी, स्वामी विवेकानंद अंडरपास, भाजी मंडई, घरकुलमधील भाजी मंडई अश्या विविध प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले. प्रभाग नुसताच मॉडेल नसुन तो “स्मार्ट” करण्याचे काम केले आहे. प्रलंबित विकासकामे येणाऱ्या पुढच्या काळात पूर्ण करणार, असे आश्वासन एकनाथ पवार यांनी दिले.

                                                                                                                              श्रीकांत कदम यांनी सूत्रसंचालन केले. पोपट हजारे यांनी आभार मानले.
Leave A Reply

Your email address will not be published.