आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता

0

मुंबई : शहारुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. आजवरचा सर्वात मोठा खुलासा समोर आला आहे. यामुळे एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. या कारवाईची पडताळणी करण्यासाठी एनसीबीचे महासंचालक एस. एन. प्रधान यांच्या नेतृत्वात स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाची चौकशी अद्याप पूर्ण झाली नसली तरी या एसआयटीचे काही महत्वाची माहिती समोर आली आहे.

आर्यन खानकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज आढळलेच नव्हते. तसेच अंमली पदार्थांच्या कोणत्याही मोठ्या कटाचा किंवा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी रॅकेटचा तो भाग असल्याचा कोणताही पुरावा या तपास पथकाला आढळून आलेला नाही. त्यामुळे त्याचा फोन घेवून त्याचे चॅट्स तपासण्याची गरज नव्हती. याशिवाय चॅट्स तपासले असले तरी ते असे सुचवत नाहीत की आर्यन कोणत्याही आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा भाग होता, असेही मत यात मांडण्यात आले आहे.

तसेच आर्यनने त्याचा मित्र अरबाज मर्चंट याला संबंधित क्रूझवर ड्रग्ज आणण्यास सांगितलं नव्हते, असाही निष्कर्ष एसआयटीच्या चौकशीतून मांडण्यात आला आहे. याचसोबत समीर वानखेडे यांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हटले आहे की, एनसीबीच्या मॅन्युअलमध्ये अनिवार्य असूनसुद्धा छाप्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला नव्हता. गुन्ह्यात अटक केलेल्या अनेक आरोपींकडून जप्त केलेले ड्रग्ज हे सिंगल रिकव्हरी म्हणून दाखवले आहेत, असाही निष्कर्ष एनसीबीच्या एसआयटीने काढला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.